शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडत असून तो नाणे घाट या डोंगर रांगेवर वसलेला आहे.

Shivneri Fort

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort) झाला आहे. हा किल्ला पुणे जिल्हयातील जुन्नर या गावी असून तो पुण्यापासून ९५ किमी अंतरावर आहे. शिवनेरी किल्ल्यावरती महादरवाजा, पीर दरवाजा, हत्ति दरवाजा, शिपाई दरवाजा शिवाई देवीचे मंदिर अंबर खाना इत्यादी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत.

शिवनेरी किल्ल्यावर कसे पोहचाल? | How to reach Shivneri Fort

रेल्वे
आपण पुण्यापर्यंत रेल्वेने येऊ शकता. पुणे स्टेशन वरुन आपण खाजगी वाहनाने या किल्ल्यावरती जाऊ शकता.
बस
आपण महाराष्ट्र शासनाच्या बस ने सुद्धा जाऊ शकता. त्यासाठी आपल्याला स्वारगेट पासून जुन्नरला जाणारी बस पकडावी लागते.
विमानाने
शिवनेरी किल्ल्याच्या जवळ पुणे येथे विमानतळ आहे. आपण या विमान तळावर उतरून खाजगी वाहनाने किंवा टॅक्सी ने या किल्ल्यावरती जाऊ शकता.

शिवनेरी किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाण | Places to see on Shivneri fort

1. शिवाई देवीचे मंदिर

शिपाई दरवाज्यातून प्रवेश केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या वाटेने पुढे गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर आपल्याला पाहण्यास मिळते. या मंदिरामध्ये शिवाई देवीची मूर्ती स्थापित केलेली आहे. या मंदिराच्या मागे सहा ते सात गुहा आहेत. परंतु या गुहांची खूप पडझड झालेली आहे.

2. पाण्याचे तलाव

शिवनेरी किल्ल्यावरती तलाव सुद्धा आहेत. या किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी एक तलाव आहे त्यामध्ये यमुना आणि गंगा या झऱ्यामधून सतत पाणी वाहत असते.

3. अंबरखाना

कुलाबकर दरवाज्यातून प्रवेश केल्यावर समोरच अंबर खाना आहे. या अंबर खाण्याचा उपयोग धान्य साठवण्यासाठी होत असे. आताच्या घडीला या अंबरखानाची फार मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.

4. शिवकुंज

शिवकुंज हे या किल्ल्यावरील सर्वात सुंदर स्मारक आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले आहे. या शिवकुंजामद्धे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे पुतळे बसवलेले आहेत.

5. शिवजन्म स्थानाची इमारत

ही इमारत दुमजली असून या इमारती च्या खालच्या खोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. या खोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवलेला आहे.

शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा | Shivneri fort routes

1. साखळीची वाट

जुन्नर या गावच्या बस स्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. या पुतळ्याच्या डाव्या बाजूस पुढे गेल्यावर एक मंदिर लागते. त्या मंदिराच्या समोर पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंती पाशी घेऊन जाते. या भिंतीला लावलेल्या साखळीने गडावर पोहचता येते.

2. सात दरवाज्यांची वाट

शिवपुतळ्याच्या डाव्या बाजूस चालत गेल्यास आपण गडाच्या पायऱ्या पर्यंत जाऊन पोहचतो. या रस्त्याने गडावर जाताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दूसरा पीर दरवाजा, तिसरा परवांगीचा दरवाजा, चौथा दरवाजा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा, आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या दरवाजा ने गडावर जाता येते.

शिवनेरी किल्ल्याच्या आसपासची पाहण्यासारखे ठिकाणे | Places to visit near Shivneri Fort

1. भीमाशंकर अभयारण्ये

भीमाशंकर अभयारण्ये हे महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध अभयारण्ये आहे. या अभयारण्यामध्ये प्रसिद्ध शिवलिंग आहे. ते भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध आहे. भीमाशंकर हे अभयारण्य पुण्यापासून ११० किमी अंतरावर आहे.

2. लेण्याद्री लेणी

ही लेणी पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या तालुक्यात आहे. ही लेणी डोंगरावर विस्तृत असून ती खडकामद्धे कोरलेली आहे. या ठिकाणी अष्टविनायक मधील लेण्याद्रीचा गणपती आहे.

3. माळशेज घाट ( Malshej Ghat)

माळशेज हा घाट महाराष्ट्रामधील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. हा घाट मुंबई पासून १२६ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ११९ किमी अंतरावर आहे. माळशेज घाटामद्धे आपण असंख्य धबधबे, तलाव, हिरवेगार वनस्पती, जीवजंतू इत्यादी गोष्टी पाहू शकतो. माळशेज घाटावर ट्रेकिंग सुद्धा करू शकतो.

Banner Image by Nilesh Thonte

Scroll to Top