प्रतापगड किल्ला

प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये जावळीच्या खोऱ्यात घनदाट जंगलामद्धे बांधलेला आहे. प्रतापगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून तो समुद्र सपाटी पासून १०८१ मीटर एवढ्या उंचीवर आहे.

Pratapgad fort

प्रतापगड किल्ला (Pratapgad Fort) म्हटल की आठवते शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ही म्हण. याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान यास ठार मारले होते. किनेश्वर आणि पार या दोन्ही गावामधील टेंभावर प्रतापगड बांधण्यात आलेला आहे.

थोडक्यात
प्रतापगडावर कसे जायचे?
प्रतापगड इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई
प्रतापगडावर पाहण्यासारखी ठिकाणे

प्रतापगडावर कसे जायचे? | How to reach Pratapgad Fort?

१. विमानाने
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रतापगडाच्या जवळचे विमानतळ आहे. प्रतापगडापासून विमानतळाचे अंतर हे १४७ किमी एवढे आहे. या विमानतळापासून आपण खाजगी वाहनाने प्रताप गडावर जाऊ शकतो.
२. रेल्वे स्टेशन
प्रतापगडापासून सातारा येथील रेल्वे स्टेशन जवळचे आहे. या रेल्वेस्टेशन पासून प्रतापगडाचे अंतर ८०.५ किमी एवढे आहे. रेल्वे स्टेशन पासून टॅक्सीने किंवा खाजगी वाहनाने प्रतापगडावर जाऊ शकतो.

प्रतापगड इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई | Pratapgad Fort History

महाराजांनी आदिलशाहीचे किल्ले जिंकण्यास सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी आदिलशाह ची बेगम ने अफजल खान यास पाठवले होते. अफजल खान मोठा शक्तीशाली होता. परंतु त्यास छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर अगदी कल्पकतेने ठार मारले.

प्रतापगडावर पाहण्यासारखी ठिकाणे | Best places to see on Pratapgad Fort

१. प्रतापगड प्रवेशद्वार

गडाचे प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील आहे. प्रवेशद्वार चा दरवाजा हा सागाच्या लाकडाणे बनलेला आहे.

२. शिवप्रताप बुरूज

प्रतापगडावर या बुरुजाला शिवप्रताप बुरूज किंवा अफजल बुरूज असेही म्हणतात.

३. राजमार्ग

राजपरिवारासाठी हा मार्ग होता.

४. भवानी माता मंदिर

प्रतापगडावर भवानी माता चे मंदिर आहे. या मंदिरामध्ये स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.

५. राजवाडा

प्रतापगडावर एक छोटासा राजवाडा होता. ब्रिटिशांनी हा राजवाडा उद्ध्वस्त केलेला आहे. महाराजांची आठवण म्हणून या राजवड्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोड्यावर बसलेला आवेशपूर्ण असा पुतळा आहे. हा पुतळा पंचधातू नी बनलेली आहे. या पुतळ्याचे वजन हे सुमारे ४.५ टन एवढे आहे.

Banner image credit: Shivaji Desai

Scroll to Top