मुरुड-जंजिरा दुर्ग

मुरुड-जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुक्यात राजापुरी गावापासून सुमारे ५०० मीटरच्या अंतरावर आहे. तसेच हा किल्ला मुरुड पासून १.५ किलोमीटर अंतरावर आहे.

Murud Janjira Fort view from shore

महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या किल्ल्यांपैकी अजिंक्य असणारा किल्ला म्हणजे मुरुड-जंजिरा हा दुर्ग होय. जंजिरा दुर्ग मुरुड बेटावर असुन तो २२ एकर मध्ये पसरलेला आहे. अलिबागपासून मुरुड-जंजिरा दुर्ग ५५ किलोमीटर एवढा अंतरावर आहे. मुरुड-जंजिरा किल्ल्याची उंची समुद्र किनाऱ्यापासून सुमारे ९० फुट एवढी आहे तर पायाची उंची २० फुट एवढी आहे. अनेक राज्यकर्त्यांनी मुरुड-जंजिरा दुर्ग जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला.

थोडक्यात:
या दुर्गाला मुरुड-जंजिरा नाव कसे पडले?
मुरुड-जंजिरा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
मुरुड-जंजिरा किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा
मुरुड-जंजिरा किल्ल्याचा इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज आणि मुरुड-जंजिरा
छत्रपती संभाजी महाराज आणि मुरुड-जंजिरा
मुरुड-जंजिरा दुर्गाला भेट देण्यासाठी उत्तम महिना
मुरुड-जंजिरा दुर्गाची विशेष माहिती

या दुर्गाला मुरुड-जंजिरा नाव कसे पडले?

जंजिरा हे नाव अरबी भाषेमधील आहे. अरबी भाषेमध्ये जझीरा म्हणजे बेट आणि जल म्हणजे पाणी, पाण्याने वेढलेल्या जझीरावरील किल्ला म्हणजे जंजिरा असे या किल्ल्याचे नाव पडलेले आहे.

Places to see on Murud-Janjira Fort | मुरुड-जंजिरा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे

१. पश्चिम दरवाजा (दर्या दरवाजा)

या दरवाजाचे तोंड समुद्राच्या बाजूने असल्याने त्यास दर्या दरवाजा असेही म्हणतात. या दरवाज्याच्या समोर समुद्र असल्याने संकटाच्या काळी या दरवाजाने बाहेर पडता येत असे.

२. सुरूलखानचा वाडा

या किल्ल्याच्या बाहेर पडल्यानंतर समोर तीन मजली इमारत दिसते त्यास सुरूलखानचा वाडा असे म्हणतात. हा वाडा पूर्वी सात मजली होता.

३. गोड्या पाण्याचा तलाव

सुरूलखानचा वाड्याच्या उत्तरेस एक षटकोणी आकाराचा गोड्या पाण्याचा तलाव आहे. या तलावाचा व्यास सुमारे २० मीटर असून या तलावाची खोली ६० फुट खोल एवढी आहे. या तलावाला शाही तलाव असेही बोलले जात असे.

४. नगारखाना

मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारा जवळ नगारखाना आहे.

५. कलाल बांगडी तोफ

कलाल म्हणजे अग्नीचा कल्लोळ. कलाल बांगडी तोफ धातूच्या गोलाकार बांगडया एकमेकांना जोडुन बनवलेली आहे. या तोफेचे वजन सुमारे २२ टन एवढे आहे. या तोफेचा विशेष गुणधर्म म्हणजे कलाल बांगडी तोफ अशा धातुंपासून बनवली आहे जी कडक उन्हामध्ये सुद्धा गरम होत नाही. कलाल बांगडी तोफेचे गोळे एवढे दूर जात होते की या तोफेची शत्रुंना भीती वाटत असे.

 ६. गायमुख तोफ

 या तोफेचा पुढचा भाग हा गायीच्या तोंडासारखा असल्यामुळे या तोफेला गायमुख असे म्हणतात. तशीच ही तोफ लांडा कासम या नावाने सुद्धा ओळखली जाते. या तोफेचे वजन सुमारे ८ टन एवढे आहे.

७. चावडी तोफ

या तोफेचे वजन सुमारे १६ टन एवढे आहे.

८. पारशी लेख

 प्रवेश द्वाराजवळ पांढऱ्या दगडात पारशी भाषेमध्ये लेख आहेत.

९. भुयारी मार्ग

मुरुड-जंजिरा किल्ल्याला भुयारी मार्ग सुद्धा आहे. तो भुयारी मार्ग समुद्राखाली सुमारे ५० टे ६० फुट खोल एवढा आहे. हा भुयारी मार्ग राजापुरी गावापर्यंत जातो. पूर्वी या भुयारी मार्गाचा उपयोग गुप्त मार्गासारखा केला जात असे.

१०. बालेकिल्ला

तलावाच्या बाजूला पायऱ्या आहेत, या पायऱ्या बालेकिल्ल्याकडे घेऊन जातात. या बालेकिल्ल्यावर भारताचा झेंडा फडकवला जातो.

११. किल्ल्यावरील शिल्प

वाघाच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये हत्ती पकडले आहेत असे या किल्ल्यावर शिल्पे आहेत, तशीच हे शिल्पे अमर्याद सागरी सत्तेचे प्रतीक दर्शवतात.

How to go to Murud-Janjira fort? | मुरुड-जंजिरा किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा

१. अलिबाग मार्गे

मुरुड-जंजिरा या किल्ल्यावरती जायचे असेल, तर पुणे मुंबई मार्गे अलिबाग गाठायचे आणि अलिबाग वरून रेवदंडा मार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावातून किल्यावर जाण्यासाठी बोट सेवा उपलब्ध आहे.

२. दिघी मार्गे

आपण कोकणातून सुद्धा या गडावरती जावू शकतो. त्यासाठी आपल्याला महाड-गोरेगाव-म्हसळे-दिघी या गावी जावे लागते आणि त्या गावामधून मुरुड-जंजिरा किल्यावरती जाता येते.

३. तिसरा मार्गे

पाली-रोहा-नगोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे ने सुद्धा मुरूडला जाता येते.

Murud-Janjira fort history | मुरुड-जंजिरा दुर्गाचा इतिहास 

मुरुड-जंजिरा हा किल्ला जलदुर्ग प्रकारात मोडत असल्याने या किल्ल्यावरती कोळयांचे आणि मच्छिमारांचे वास्तव होते. या गडावरती वास्तवात असणारे कोळी लोकांना आणि मच्छिमारांना समुद्र लुटारे खूप त्रास देत असे. राम पाटील हे या कोळी लोकांचे प्रमुख होते. समुद्री लुटारांपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून मेढकोट किल्ला म्हणजे लाकडाचा किल्ला बांधावा असे त्यांनी ठरवले. परंतु हा किल्ला निजामशाहीकडे असल्याने निजामशाहीची परवानगी घेणे गरजेचे होते. निजामाची परवानगी घेऊन मुरुड-जंजिरा किल्ला बांधला. पुढे राम पाटलाने गडावरील लोकांचे एकीकरण करून शिफबंदी उभारली. यामुळे राम पाटलांची ताकद वाढली.

मुरुड-जंजिरा किल्ल्यावरती राम पाटील यांचे वाढते वर्चस्व निजामशाहीला आवडत नसे. मग निजामशाहीने पिरमल खान याची गडावरती ठाणेदार म्हणून नेमणूक केली. पिरमल खान याने दारूचा व्यापारी असे म्हणून राम कोळीशी मैत्री केली. एके दिवशी पिरमल खानने राम कोळी आणि त्याच्या साथीदारांना दारू पाजून त्यांच्या कत्तली केल्या आणि मुरुड-जंजिरा किल्ला पिरमल खानने आपल्या ताब्यात घेतला. पुढे निजामशाहीने पिरमल खानचा मृत्रु झाल्यानंतर बुऱ्हाखानला मुरुड-जंजिरा दुर्गाचा किल्लेदार म्हणून नेमले. बुऱ्हाखानने निजामशाहीची परवानगी घेऊन जुना बांधलेला किल्ला पाडून या दुर्गाचे नूतनीकरण केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मुरुड-जंजिरा 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुरुड-जंजिरा हा किल्ला जिंकण्यासाठी १६५७ साली रघुनाथ सबनीस यांच्यावर मोहिमेची जबाबदारी दिली होती. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. पुढे १६६९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जंजिराची मोहीम हाती घेतली होती. यावेळेस पायदळ सैन्याने दंडा व राजापुरी वर चढाई करायची आणि नौदलाने जंजिऱ्यावर स्वारी करून जंजिराची कोंडी करायची अशी योजना आखण्यात आली होती. त्यावेळेस जंजिऱ्यावर सिद्धी फत्तेखान आणि त्याचे साथीदार संबूल व कासीम हे सैनिक होते.

महाराजांनी ठरवल्या प्रमाणे दंडा आणि राजापुरी तसेच राजपुरीच्या अवतीभोवती असणारे सात किल्ले जिंकून घेतले. आता छत्रपती शिवाजी महाराज हे आपली कोंडी करणार हे कळताच फत्तेखान ने मुंबईच्या इंग्रजांना मदतीसाठी हात जोडले. परंतु सुरतेच्या इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताकदीची कल्पना होती, म्हणून त्यांनी तटस्थ राहण्याचा सल्ला मुंबई च्या इंग्रजांना दिला. फत्तेखानचा हा डाव फसल्यानंतर त्याने मोगलांना विनंती केली. मोगलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खलिता पाठवून वेढा उठवण्याची तंबी दिली. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच पुरंदरचा तह झाला होता. परंतु महाराजांनी मोगलांच्या खलिताकडे दुर्लक्ष केले, आणि वेढा अजून बळकट केला. फत्तेखानची अजूनच कोंडी झाली. त्यानंतर महाराजांनी फत्तेखानला खलिता पाठवला आणि स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले. भितीने कासावीस झालेला फत्तेखान त्यास तयार झाला. परंतु फत्तेखानचे साथीदार त्याच्या विरोधात गेले आणि फत्तेखान फितूर झाला असे म्हणत त्यास तुरुंगात टाकले. नंतर सिद्धी सबुल हा मुरुड-जंजिरा दुर्गाचा मुख्य सिद्धी झाला आणि कासीम हवालदार तर सिद्धी खैर्यत हे जंजिराचे किल्लेदार झाले.

छत्रपती संभाजी महाराज आणि मुरुड-जंजिरा

छत्रपती संभाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा दुर्ग जिंकण्यासाठी जवळच पद्मदुर्ग हा दुर्ग बांधला होता. परंतु औरंगजेब बादशाहाने अचानकपणे मुघल सरदार हसन अलीला चाळीस हजार सैन्य देऊन स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या किल्ल्यावर स्वारी करण्यास पाठवले. कारण औरंगजेबाला कळून चुकले होते की, जर छत्रपती संभाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा दुर्ग जिंकला तर मराठ्यांचे समुद्रावर वर्चस्व अजून बळकट होईल. औरंगजेब बादशहामुळे छत्रपती संभाजी महाराजांना मुरुड-जंजिरा ही मोहीम अर्ध्यातच सोडावी लागली होती.

Best time to visit Murud Janjira fort | मुरुड-जंजिरा दुर्गाला भेट देण्यासाठी उत्तम महिना

मुरुड-जंजिरा हा दुर्ग महाराष्ट्रात असून येथील पाऊस हा खूप त्रासदायक आहे. जंजिरा हा जलदुर्ग असल्यामुळे पावसाळ्यात हा दुर्ग बंद असतो. मुरुड-जंजिरा दुर्गावर जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा महिना उत्तम समजला जातो.

Things to know before you go to Murud Janjira fort | मुरुड-जंजिरा दुर्गाची विशेष माहिती

१. मुरुड-जंजिरा दुर्ग ३५० वर्षे कोणीही जिंकू शकला नाही म्हणून हा दुर्ग आजही अजिंक्य आहे.

२. सिद्धिंनी या किल्ल्याला मेहबूब असेही नाव ठेवले होते.

३. गोड्या पाण्याच्या विहिरीला लागूनच राणीचा शीशमहाल होता. त्या महालाला सात रंगाच्या काचा होत्या आणि त्या काचांचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडून ते इंद्रधनुष्यासारखे दिसत असायचे.

४. मुरुड-जंजिरा हा किल्ला बांधण्यासाठी जवळपास २२ वर्षे लागले होते.

Banner image by Ankur Panchbudhe.

Scroll to Top