किनाऱ्यांसाठी आपला महाराष्ट्र लोकप्रिय आहे. महाराष्ट्र राज्याला एकूण ७२० किमी लांब समुद्रकिनारा लाभला आहे. यामद्ये गणपतीपुळे, अलिबाग, मांडव, किहीम, हरिहरेश्वर इत्यादी समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. या समुद्र किनाऱ्यांवर बरेच साहसी जलक्रीडांचा आनंद घेताना पर्यटक दिसून येतात.
गणपतीपुळे बीच (Ganpatipule beach)
अलिबाग बीच (Alibaug beach)
तारकर्ली बीच (Tarkarli beach)
हरिहरेश्वर बीच (Harihareshwar beach)
बासीन बीच (Bassein beach)
किहीम बीच (Kihim beach)
मांडवा बीच (Mandwa beach)
डहाणू-बोर्डी बीच (Dahanu bordi Beach)
वेंगुर्ला-मालवण बीच (Vengurla Malvan beach)
मार्वे मनोरी बीच (Marve Manori beach)
गणपतीपुळे बीच | Ganpatipule beach information in Marathi Language
गणपतीपुळे बीच हा महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी शहरापासून २५ किमी अंतरावर आहे. गणपतीपुळेच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वत आहे. नावाप्रमाणेच गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ असून येते एक प्राचीन गणेश मंदिर आहे. जे पाहण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. गणपतीपुळे बीच हा साधारण १२ किमी अंतराचा आहे. हा समुद्रकिनारा स्वच्छ असून येथे दूरदूर पसरलेली पांढरी वाळू तुम्हाला मिळेल. या बीच वरती आपण पॅराग्लाईडींग, पोहणे, मोटारबोट, वॉटर स्कूटर आणि पेडल बोट राईड, कॅमल राईड यांसारख्या जलक्रीडा करू शकता.
गणपतीपुळे बीचला कसे जायचे?
रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यापासून जवळचे स्टेशन आहे.
गणपतीपुळे बीचला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हिवाळी महिन्यांमद्ये गणपतीपुळे ला बरेच प्रवासी भेट देतात. हिवाळ्यात येणाऱ्या दिवाळी सणाला बीचवरती असंख्य दिवे लावून दिवाळी सण साजरा केला जातो. पावसाळ्यात बहुतेक सर्वच समुद्रकिनारे बंद असतात. त्यामुळे मान्सून मद्ये तुम्हाला गणपतीपुळे मद्ये जास्ती प्रवासी दिसणार नाहीत.
अलिबाग बीच | Alibaug beach information in Marathi Language
अलिबाग हे कोकण किनारपट्टीवरील एक छोटेसे शहर आहे. बऱ्याच नवविवाहित दाम्पत्यांची अलिबाग ला पसंती असते. मुंबईपासून १०८ किमी अंतरावर असलेला अलिबाग किनारा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. येते विकेंड ला भरपूर गर्दी असते. बोट रेसिंग, पॅरासेलिंग, इत्यादी जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी अलिबाग किनारा लोकप्रिय आहे. अलिबाग पासून जवळच कुलाबा नावाचा किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी १६८० साली बांधला होता.
अलिबागला कसे जायचे?
मुंबई ते मांडवा हा प्रवास तुम्ही बोटीने करू शकता. मुंबई पासून अलिबागकडे येणाऱ्या बऱ्याच बोट सर्व्हिस उपलब्ध आहेत. मुंबईपासून मांडवा किनाऱ्यापर्यंत बोटीने येऊन पुढे खाजगी वाहनाने अलिबाग बीच वर येत येईल. तुम्ही रेल्वे ने येणार असल्यास पेण रेल्वे स्टेशन हे अलिबाग पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
तारकर्ली बीच | Tarkarli Beach information in Marathi Language
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असणारा तारकर्ली बीच हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मुंबईपासून २६५ किमी तर पुणे पासून ३९४ किमी अंतरावर असणारा तारकर्ली बीच स्कुबा डायविंग व तत्सम साहसी वॉटर स्पोर्टसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला स्कुबा डायविंग करायचे नसेल तर तुम्ही स्नॉर्कलिंग सारख्या जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. डॉल्फिन मासा पाहण्यासाठी तुम्हाला लोकांची येथे गर्दी दिसेल. जवळच्या कर्ली नदीवर असणाऱ्या बोटीमद्ये मुक्काम करण्याची सोया आहे. समुद्रीक्रीडांसाठी तारकर्ली बीच झपाट्याने नावारूपाला येत आहे.
तारकर्ली बीचवर कसे जायचे?
सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे तारकर्ली बीच पासून जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तारकर्ली बीच साठी कुडाळ आणि कणकवली रेल्वे स्टेशन वरून देखील जाण्याची सोय आहे. चिपी एअरपोर्ट हे सिंधुदुर्ग मधील विमानतळ तारकर्ली पासून जवळचे विमानतळ आहे.
तारकर्ली बीच वर राहण्यासाठी उत्तम सोया आहे. महाराष्ट्र व देशातील बऱ्याच लोकांचे हे आवडते पर्यटन स्थळ असल्याने येथे नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. सिंधुदुर्ग मद्ये महाराष्ट्र शासनाचे MTDC रिसॉर्ट देखील येथे उपलब्ध आहे.
हरिहरेश्वर बीच | Harihareshwar beach information in Marathi Language
हरिहरेश्वर बीच हा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पासून अगदी २० किमी च्या अंतरावर आहे. आंब्याच्या बागांनी नटलेला हा बीच शिव आणि काळभैरव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरामुळे हरिहरेश्वर ला दक्षिण काशी असे देखील म्हणतात. हरिहरेश्वर बीच मुंबई पासून १८४ किमी तर पुण्यापासून सुमारे १६१ किमी अंतरावर आहे. हरिहरेश्वर बीच वरती वॉटर स्पोर्ट्स चा आनंद घ्यायला पर्यटक येत असतात. माणगाव स्टेशन हे हरिहरेश्वर बीच पासून ५० किमी अंतरावर आहे. माणगाव मधून कॅब किंवा रिक्षा करून हरिहरेश्वर बीच वरती येत येईल.
बासीन बीच | Bassein beach information in Marathi Language
बासीन बीच हे एक ऐतिहासिक ठिकाण असून मुंबईपासून ते ७७ किमी अंतरावर आहे. बासीन बीच हा २०० मीटर लांबीचा समुद्र किनारा असून या मद्ये काही तलाव देखील आढळून येतात. पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारा वसईचा किल्ला हा याच बासीन बीच वरती आहे. १८ व्या शतकात पेशवा बाजीराव यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्प्पा यांनी किल्ला मराठा साम्राज्यामद्ये विलीन करून घेतला.
बासीन बीच वर कसे जायचे?
वसई रेल्वे स्टेशन हे बासीन बीच पासून जवळचे रेल्वे स्टेशन आहे. ८ किमी अंतरावर असणारे वसई रेल्वे स्टेशन पासून बासीन बीच ला यायला राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत.
किहीम बीच | Kihim beach information in Marathi Language
अलिबाग पासून १३ किमी अंतरावर असणारा किहीम बीच हा महाराष्ट्रातील आणखीन एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. किहीम बीच मुंबई पासून ९९ किमी अंतरावर असून हे एक व्यावसायिक केंद्र बनले आहे. सूर्यास्ताच्या वेळी छान असे सेल्फी काढणे हा प्रकार या बीच वर सर्रास केला जातो. किहीम बीच वरती कॅम्पिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक येत असतात.
किहीम बीच पासून अलिबाग हे जवळचे मोठे शहर आहे. अलिबाग पासून किहीम बीच वरती भरपूर रिक्षा नेहमी चालू असतात. किहीम बीच वर बोटीने येण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई पासून बोटीने निघाल्यावर मांडवा बंदरात उतरायचे आणि तिथून खाजगी वाहनाने किहीम बीच ला जाता येते. नोव्हेंबर ते जुलै हा महिना किहीम बीच ला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यामद्ये देखील आपण किहीम बीच ला भेट देऊ शकता.
माांडवा बीच | Mandwa beach information in Marathi Language
मांडवा बीच वर जाण्यासाठी मुंबईपासून सतत बोटीची सोय उपलब्ध आहे. मांडवा बीच मुंबई पासून १०७ तर पुण्यापासून १५२ किमी अंतरावर आहे. मांडवा बीच च्या अगदी जवळच जंगल असल्याने हा बीच प्रदूषणापासून वेगळा राहिला आहे. मांडवा बीच वरती नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मांडवा बीच हा बौद्ध लेणी, मंदिरे, आणि पोर्तुजकालीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ मद्ये प्रसिद्ध झालेला अग्निपथ चित्रपटामध्ये मांडवा बीच चा उल्लेख आढळतो. मांडवा बीच वरती अनेक जलक्रीडा केल्या जातात. जवळच असलेल्या करमरकर संग्रहालय पाहण्यासाठी मांडवा बीच वर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. पेण रेल्वे स्टेशन मांडवा पासून जवळचे जवळचे मोठे स्टेशन आहे.मांडवा बीच ला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महिने सर्वोत्तम आहेत. पावसाळ्यामद्ये या बीच वर भरपूर पाऊस असल्याने सहसा सर्व कोकण किनारपट्टी पर्यटकांसाठी बंद असते.
डहाणू – बोर्डी बीच | Dahanu – Bordi beach information in Marathi Language
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात बोर्डी बीच वसलेला आहे. तो मुंबईपासून साधारण १५० किमी अंतरावर आहे. या बीच वरती सहसा पर्यटकांची गर्दी दिसून येत नाही. बोर्डी बीच हा वहींद्रा नदी आणि घोलवड खाडी दरम्यान वसलेला आहे. पारसी लोकांचे धर्मस्थळ या भागात आढळते. डहाणू हे शहर बोर्डी बीच पासून १७ किमी अंतरावर आहे. तसेच ते या भागातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे.
वेंगुर्ला मालवण बीच | Vengurla Malvan beach information in Marathi Language
ऐतिहासिकदृष्ट्या व्यापारी वसाहत अशी ओळख असणारे मालवण शहर सिंधुदुर्ग शहराच्या नैऋत्येस ३८ किमी अंतरावर आहे. मालवण बीचच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत रांग आणि दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र आहे. मालवण बीचच्या शेजारच्या टेकड्यांवर आंबे काजू यांच्या बागा आहेत. निवती बीच, शिरोडा बीच, मोचेमाड बीच, सागरेश्वर बीच आणि वायंगणी बीच असे भरपूर बीच मालवण च्या किनाऱ्यालगत आहेत.
स्कुबा डायविंगसाठी मालवण बीच प्रसिद्ध आहे. तसेच पॅरासेलिंग, बनाना ट्यूब ट्रिप असे बरेच वॉटर स्पोर्ट येथे केले जातात. सावंतवाडी हे मालवण बीच पासून सर्वात जवळचे विमानतळ आहे. कुडाळ रेल्वे स्थानक हे मालवण पासून ३० किमी अंतरावर असणारे दुसरे मोठे रेल्वे स्टेशन आहे.
मार्वे मनोरी बीच | Marve Manori beach information in Marathi Language
महाराष्ट्रामद्ये मनोरीची खाडी अशी ओळख असणाऱ्या मार्वे मनोरी हा बीच मुंबईपासून ५० किमी च्या अंतरावर आहे. मूळ भारतीय म्हणून ओळख असलेले कोळी, कुणबी, भंडारी लोक या मार्वे मनोरी किनारी राहताना आढळतात. या भंडारी लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि मासेमारी आहे. मुंबईपासून जवळ असल्याने एका दिवसाच्या ट्रिपसाठी बरेच मुंबईकर येथे पर्यटनासाठी दिसून येतात. मालाड रेल्वे स्टेशन हे मनोरी बीच पासून ३३ किमी अंतरावर आहे. मनोरी बीच वर जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हे महिने सर्वोत्तम आहेत.