पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारात मोडत असून त्याची ऊंची १५०० मीटर एवढी आहे. पुण्यापासून जवळ असलेल्या सह्याद्री च्या रांगेत हा किल्ला आहे.

Purandar Fort view

स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती (Purandar Fort) झाला होता. पुण्याच्या आसपासच्या किल्ल्यावरती जायचे ठरले आणि ट्रिप एक दिवसाची (one day trip near Pune) असेल तर सरळ आवरायला सुरवात करायची आणि पुरंदरला जायला निघायच. चला तर पाहूया पुरंदर किल्ल्याची माहिती मराठी भाषेमध्ये (Purandar Fort information in Marathi Language).

थोडक्यात :
पुरंदर किल्ल्याची ओळख
पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा
पुरंदर किल्ल्यावर तुम्ही कसे पोहचाल?
पुरंदर किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे
पुरंदर किल्ल्यावरील काही मंदिरे
इतिहास: पुरंदरचा तह

Purandar Fort Introduction | पुरंदर किल्ल्याची ओळख

पुण्यापासून हा किल्ला ४० किमीच्या अंतरावर आहे. पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक, बिनी दरवाजा, पेशवे यांचा वाडा, दिल्ली दरवाजा, उत्तराभिमुख दरवाजा, खंदकडा इत्यादी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा

पुरंदर किल्ल्यावर पुण्यातून जायचे असल्यास सासवड गावी यावे लागते. तेथून नारायणपुर या गावी जावे लागते. नारायणपुर हे गाव गडाच्या पायथ्याशी आहे. पुण्यातून सासवड गावी येऊन सासवड-भोर हि बस पकडावी. या गाडीने नारायणपुर या गावाच्या पुढे असणाऱ्या ‘पुरंदर घाटमाथा’ या बस स्टॉप वर उतरावे. या बस स्टॉप वर उतरल्यावर एक दोन घरे दिसतात. या घराच्या पाठीमागून एक पायवाट जाते. याच पायवाटेने आपण बिनी दरवाज्यापाशी पोहचतो.

पुरंदर किल्ल्यावर तुम्ही कसे पोहचाल?

खाजगी वाहन (private vehicle)
खाजगी वाहनाने आपण पुरंदर किल्ल्यावर जाऊ शकता. पुरंदर किल्ल्यावर कार पार्किंग (car parking available) ची सोय आहे.

पुरंदर किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

1.बिनी दरवाजा

पुरंदरमाची वरील बिनी दरवाजा हा नारायणपुर या गावातून किल्ल्याकडे जाताना लागतो. बिनी दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच पुरंदरचा खंदकडा आहे. या दरवाज्यातून आत सरळ पुढे गेल्यावर सैनिकी बराकी (Militari Camp) आणि काही बंगले आहेत.

२. मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक

बिनी दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे समोरच मुरारबाजी यांचे स्मारक दिसते. १९७० मध्ये हे स्मारक उभे केले आहे.

३. पेशवे वाडा

पुरंदर किल्ल्यावर दुमजली पेशवे वाडा असून तो बालाजी विश्वासनाथ भट यांनी बांधून घेतला होता.

४. दिल्ली दरवाजा

बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच आपण दिल्ली दरवाज्यापाशी पोहचतो.

५. उत्तराभिमुख दरवाजा

उत्तराभिमुख दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर अजून एक दरवाजा लागतो. त्या दरवाज्याच्या डावीकडील वाट बालेकिल्ला च्या दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर गडावरील काही मंदिरे आणि किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या लागतात.

६. खंदकडा

दिल्ली दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे हि खंदकडा आहे. या खंदकडेच्या शेवटी एक बुरूज आहे.

७. भैरव खिंड

भैरव खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी एक मार्ग आहे. या खिंडीच्या उजव्या बाजूला एक तलाव आहे त्यास राजले तलाव असे म्हणतात. तसेच या खिंडीत छत्रपती शिवाजी महराज यांचा पुतळा आहे.

पुरंदर किल्ल्यावरील काही मंदिरे

१. पुरंदरेश्वर

मुरारबाजी देशपांडे यांच्या सामधीपासून थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर आहे त्यास पुरंदरेश्वर मंदिर असे म्हणतात. हे मंदिर महादेवाचे असून ते हेमाडपंथी घाटणीचे आहे. थोरल्या बाजीराव पेशवा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.

२. रामेश्वर मंदिर

हे मंदिर सुद्धा महादेवाचे असून ते पुरंदरेश्वर मंदिराच्या मागे कोपऱ्यात आहे.

३. केदारेश्वर मंदिर

केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्यास कोकण्या बुरूज असे म्हणतात. टेकडीवरील केदारेश्वर मंदिर पुरंदरचे मूळ दैवत आहे. महाशिवरात्रीला या मंदिरात फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

Purandar Fort History: Treaty of Purandar 1665 | इतिहास: पुरंदरचा तह

छत्रपती शिवाजी महराजांनी सूरत शहरावर छापा घातल्यावर औरंगजेब बादशाह प्रचंड चिडला होता. त्याने मराठ्यांचा पाडाव करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग यास पुरंदरचा किल्ला घेण्यासाठी पाठवले होते. त्यावेळेस मुरारबाजी देशपांडे हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. मिर्झाराजे जयसिंग आणि मुरारबाजी यांच्यात युद्ध झाले. या युद्धामध्ये मुरारबाजी यांना वीरमरण आले. हे जेव्हा छत्रपती शिवाजी महराज यांना कळले तेव्हा छत्रपती शिवाजी महराज यांनी तहाची बोलणी केली. ११ जून १६६५ मध्ये केलेल्या या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना २३ किल्ले गमवावे लागले.

Banner image credit: Ashwin Baindur

Scroll to Top