सह्याद्री पर्वत रांगेवर वसलेला राजमाची किल्ला पुण्यापासून ७९ किलोमीटर अंतरावर आहे. श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन या किल्ल्याचे बालेकिल्ले आहेत. राजमाची किल्ल्याची उंची ही ८३३ मीटर इतकी आहे. तसेच ट्रेक च्या दृष्टीने हा किल्ला मध्यम स्वरूपाचा समजला जातो. हा किल्ला सातवाहनांनी बांधलेला आहे. १६५७ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. या किल्ल्यामद्ये गुप्त प्रवेशद्वार, भक्कम भिंती, पाण्याचे साठे, निवासी ठिकाणे, प्रशासकीय केंद्रे, मंदिरे इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
राजमाची पायथ्याच्या गावी कसे जावे?
उधेवाडी हे गाव राजमाचीच्या पायथ्याशी आहे. पुण्यापासून खाजगी वाहनाने आपण लोणावळ्याच्या मार्गाने उधेवाडीपर्यंत जाऊ शकतो.
राजमाची किल्ल्यावर कसे पोहचायचे?
रेल्वे ने
मुंबई पासून आपल्याला राजमाचीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१. उद्यान एक्सप्रेस ही रेल्वे, दादर स्थानकावरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकावर जाते. ९ वाजून ३० मिनिटांनी ही रेल्वे लोणावळ्याच्या स्थानकावर पोहोचते. लोणावळ्याच्या रेल्वे स्थानकावरून आपण रिक्षा ने तुंगार्ली धरणापर्यंत जाऊ शकता. तुंगार्ली धरणापासून आपल्याला उधेवाडी पर्यंत जावे लागते. तुंगार्ली धरण ते उधेवाडी अंतर १६ किमी आहे.
२. मुंबई पासून लोकल ट्रेन ने पुण्याकडे निघाल्यास कर्जत ला उतरायचे. कर्जतच्या राम पुलावरून रिक्षा ने कोंढाणा गावापर्यंत जाऊ शकतो. या कोंढाणा गावापासून आपण ट्रेकिंग ने राजमाची किल्ल्यावर जाऊ शकतो.
बस, कार, दुचाकी वाहनाने
खाजगी वाहनाने राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१. मुंबई पासून आपण कोंढाणा गावापर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो. या कोंढाणा गावापासून आपण ट्रेकिंग ने राजमाची किल्ल्यावर जाऊ शकतो.
२. मुंबई/ पुणे – लोणावळा – उधेवाडी या मार्गाने आपण राजमाचीच्या पायथ्या पर्यंत जाऊ शकतो. पुण्यापासून राजमाची साधारण ८५ किमी अंतरावर आहे.
राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ
राजमाचीला जाण्यासाठी जून ते सप्टेंबर हे महिने सर्वोत्तम आहेत. कारण हे मान्सून मधले महिने असून यात सगळीकडे हिरवेगार गवत उगवलेले असते.
ट्रेकसाठी सोबत ठेवायच्या गोष्टी
ओळखपत्र, मुबलक पाणी, टोपी स्कार्फ गॉगल, इत्यादी.
राजमाची किल्ल्यावर ट्रेकिंग साठी येताना पायामद्ये उत्तम प्रकारचे शूज असणे आवश्यक आहे.
राजमाचीच्या किल्ल्याजवळील पाहण्याची ठिकाणे
१. तुंगार्ली तलाव
हे धरण राजमाचीच्या संपूर्ण प्रदेशाला सिंचन करण्यासाठी बांधलेले आहे. नंतर हे ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि मैदानी पिकनिकसाठी म्हणून पर्यटन स्थळ बनले. हे धारण १९३० साली बांधण्यात आले आहे.
२. वळवण तलाव
हा तलाव राजमाचीपासून १० किमीच्या अंतरावर आहे. हे एक महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळ आहे. हे धरण वळवण या गावी असल्यामुळे याला हे नाव देण्यात आले.
३. कुणे धबधबा
कुणे धबधबा म्हणजे लोणावळ्यातील २०० मीटर खाली कोसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह. एकदा तर नक्की भेट देण्यासारखे हे प्रेक्षणीय स्थळ आहे. कुणे धबधबा हा खंडाळा घाटातून उगम पावणारा महाराष्ट्रातील एक उंच धबधबा आहे.
४. पवना लेक
मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत पासून सुमारे १० किमी अंतरावर असणारे पवना लेक महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कॅम्पिंग साईट आहे. शांतता आणि मनमोहक नैसर्गिक सौंदर्यामुळे तुमचा कॅम्पिंगचा अनुभव खऱ्या अर्थाने फायद्याचा ठरतो.
५. पॅराग्लायडिंग, कामशेत
कामशेत मध्ये तुम्ही पॅराग्लायडिंग या साहसी खेळाचा आनंद घेऊ शकता.
राजमाची किल्ल्याविषयी प्रश्न
राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई किंवा पुणे या दोन्ही ठिकाणाहून तुम्ही लोणावळापाशी कुणे गावातून उधेवाडीकडे निघावे. लोणावळा पासून राजमाची किल्ला १८ किमी अंतरावर आहे.
राजमाची किल्ल्या चढण्यासाठी पायथ्यापासून साधारण २ ते ३ तास लागतात.
हा किल्ला सातवाहनांनी बांधला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ साली हा किल्ला ताब्यात घेऊन या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला.