महाराष्ट्रामधील प्रसिद्ध लेण्या

अजिंठा लेणी, वेरूळ लेणी या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. याच लेण्यांपैकी महाराष्ट्रातील काही लोकप्रिय लेण्यांविषयी आपण या लेखामध्ये माहिती बघणार आहोत.

Ajanta Caves

महाराष्ट्र हा लेण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास ५७ लेण्यांची लिखित नोंद आपल्याला सापडते.

1. वेरूळ लेणी | Ellora caves information in Marathi language

महाराष्ट्रातील वेरूळ लेणी औरंगाबाद पासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. वेरूळ लेणी ही हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांना समर्पित आहे. जगप्रसिद्ध अशा या वेरूळ लेणीमध्ये हिंदू धर्माचा जास्ती प्रभाव जाणवतो. वेरूळ लेणीमध्ये हिंदू पौराणिक कथा दाखवणारी चित्रे आणि शिल्प आढळतात. वेरूळ लेणी पाहण्यासाठी नाममात्र प्रवेश फी आकारली जाते.

वेरूळ लेणीला कसे जायचे? | How to reach Ellora caves

विमानाने
वेरूळ लेणी पासुन सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे. हे विमानतळ भारतातील प्रमुख ठिकाणांशी जोडलेले आहे. वेरूळ लेणीला जाण्यासाठी औरंगाबाद विमानळावरुन वाहनाची सोय आहे.
रेल्वे
वेरूळ लेणी पासून ६६ किमी अंतरावर औरंगाबाद स्टेशन आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे अशा प्रमुख ठिकाणांशी ते जोडलेले आहे.

वेरूळ लेणी पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ | Best time to visit Ellora caves

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे महीने वेरूळ लेणीला जाण्यासाठी सर्वोत्तम आहेत. मंगळवार सोडुन आठवडाभर ही लेणी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उघडी असते. मंगळवारी वेरूळ लेणी बंद असते.

2. अजिंठा लेणी | Ajanta caves information in Marathi language

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ही जवळपास ३४ खडक कोरुन बनवली आहे. ही लेणी औरंगाबाद पासुन सुमारे १०१ किमी अंतरावर आहे. अजिंठा लेणी ही यूनेस्को (UNESCO) च्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट आहे. या लेणीमधील कैलास मंदिराची वास्तु आश्चर्य करण्यासारखी भव्य आहे. तसेच या लेणीमध्ये हत्तीच्या आकाराचे शिल्पे सुद्धा आहेत.

अजिंठा लेणीला कसे जायचे? | How to reach Ajanta caves?

औरंगाबाद हे अजिंठा लेणीपासुन सर्वात जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन असणारे शहर आहे.

अजिंठा लेणी पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ | Best time to visit Ajanta caves

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे महीने अजिंठा लेणीला जाण्यासाठी सर्वोत्तम आहेत. सोमवारी अजिंठा लेणी बंद असते. बाकिच्या दिवशी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अजिंठा लेणी आपल्याला पाहायला मिळेल.

3. घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी | Elephanta caves information in Marathi language

महाराष्ट्रामधील सर्वात प्राचीन लेण्यांपैकी घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी आहे. ही लेणी मुंबई पासून २३ किमी तर पुण्यापासुन १६३ किमी अंतरावर आहे. घारापुरीची लेणी जगप्रसिद्ध लेण्यांपैकी आहे. या लेण्यांमद्धे हिंदू आणि बौद्ध धर्माचा प्रभाव दिसतो. हिंदू देवता शिव हे या गुहांमध्ये अनेक रूपांमध्ये दिसून येतात.

एलिफंटा लेणीला कसे जायचे? | How to reach Elephanta caves?

विमानाने
एलिफंटा लेणी पासून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई हे विमानतळ जवळचे आहे. तसेच ते एलिफंटा लेणी पासून ३० किमी अंतरावर आहे. जयपूर, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद यांसारख्या प्रमुख शहरांशी हे विमानतळ चांगले जोडलेले आहे.
रेल्वे
चर्च गेट रेल्वे स्टेशन हे या लेणी पासून जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
बस ने
एलिफंटा लेणीला जाण्यासाठी आधी गेटवे ऑफ इंडियाला यावे. एलिफंटा बेटावर जाण्यासाठी, पुढे गेटवे ऑफ इंडिया पासुन फेरीत (Jetti Boat) चढावे लागते.

एलिफंटा लेणीला जाण्यासाठी सर्वात्तम महिना | Best time to visit Elephanta caves

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे महीने एलिफंटा लेणीला भेट देण्यासाठी सर्वात्तम आहेत. फेरी सेवा आणि एलिफंटा लेणी सोमवारी बंद असतात. तसेच पावसाळ्यात एलिफंटा लेणी बंद असते.

4. कार्ला लेणी | Karla caves information in Marathi language

कार्ला लेणी ही लोणावळ्यापासुन जवळ आहे. मुंबई पासून ही लेणी ९४.४ किमी च्या अंतरावर आहे. या लेण्यांमधील वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या शतकामधील असलेले प्रार्थनागृह. या लेण्यांच्या
हॉलच्या भिंतीवर हत्ती, सिंह तसेच इतर प्राण्यांची चित्रे पाहायला मिळतात.

कार्ला लेणीला कसे जायचे? | How to reach Karla caves?

विमानाने
कार्ला लेणी पासून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई हे विमानतळ जवळचे आहे.
रेल्वे
लोणावळा रेल्वे स्टेशन हे कार्ला लेणी पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. ते कार्ला पासून ११.५ किमी अंतरावर आहे.. या ट्रेन पासून आपण टॅक्सीने किंवा कॅबने कार्ला लेणी वर जाऊ शकतो.
बसने
जर तुम्हाला कारने जायचे असेल तर लोणावळ्यापासून कार्ला लेणी फक्त १२ किमी अंतर आहे. लोणावळा ते कार्ला लेणी दरम्यान वारंवार बसेस धावतात. बसेस सकाळी ६ वाजता सुरू होतात आणि कार्ला ते लोणावळ्यासाठी शेवटची बस संध्याकाळी ७ वाजता सुटते. लोणावळा हे मुंबई, पुणे आणि नाशिक शहरांपासून चांगले जोडलेले आहे. हे एक प्रमुख जंक्शन आहे जिथे मुंबई आणि पुणे येथून येणाऱ्या सर्व बसेस येथे थांबतात.

कार्ला लेणीला जाण्यासाठी सर्वात्तम महिना | Best time to visit Karla caves

नोव्हेंबर ते मार्च हे महीने कार्ला लेणीला भेट देण्यासाठी सर्वात्तम आहेत.

कार्ला लेणी उघडण्याची वेळ

सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कार्ला लेणी खुली असते.

5. भाजा लेणी | Bhaja caves information in Marathi language

ही लेणी महाराष्ट्रामधील भाजा या गावाजवळ आहे. हे गाव मावळ जिल्ह्यामध्ये लोणावळा पासून १२.१ किमी अंतरावर आहे. भाजा लेणी पहिल्या शतकातील प्रचलित असणाऱ्या रॉक कट आर्किटेक्चरच्या (Rock-cut Architecture) उत्कृष्ट उदाहरणांपैकी एक आहे. रसिक लोक भाजा लेणीमधील सांस्कृतिक, अलंकार आणि प्राण्यांच्या पुतळ्यांचा आनंद घेऊ शकतात. या लेण्यांजवळच एक सुंदर असा धबधबा आहे.

भाजा लेणीवर कसे जायचे? | How to reach Bhaja caves?

विमानाने
पुणे येथील विमानतळ भाजा लेणी पासून जवळचे आहे. तसेच ते भाजा लेणी पासून ६३.१ किमी अंतरावर आहे. या विमानतळापासून आपण टॅक्सी ने किंवा कॅब ने सुद्धा कार्ला लेणी वर जाऊ शकतो.
रेल्वे
मळवली रेल्वे स्टेशन हे भाजा लेणी पासून जवळचे आहे. तसेच ते २.४ किमी अंतरावर आहे.
बस ने
कार्ला लेणीजवळ भाजा लेणी आहेत. लोणावळा ते कार्ला लेणी पर्यंत लोकल बसेस धावतात. कार्ला लेणीपासून सुमारे १० किमी अंतरावर भाजा लेणी आहेत. तुम्ही चालणे पसंत करू शकता किंवा कार्ला ते भाजा पर्यंत ऑटो पकडू शकता. खंडाळा हे भाजा लेण्यांपासून जवळ आहे.

भाजा लेणीला जाण्यासाठी सर्वात्तम महिना | Best time to visit Bhaja caves

नोव्हेंबर ते मार्च हे महीने भाजा लेणीला भेट देण्यासाठी सर्वात्तम आहेत.

भाजा लेणीवर जाण्यासाठी सर्वात्तम वेळ

ही लेणी दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उघडी आहे.

6. बेडसे लेणी | Bedse caves information in Marathi language

बेडसे लेणी पुण्यापासून ५४.२ किमी अंतरावर आहे. ही लेणी दोन भागामध्ये विभागली आहे. या लेणी मध्ये भव्य असे शिल्पे असलेले खांब आहेत. तसेच हत्ती, बेल, सिंह या प्राण्यांचे पुतळे आहेत. बेडसे लेणीच्या प्रार्थनागृहाच्या मधोमध घुमट आहे. या लेण्याच्या मठामध्ये साधू राहत असत.

बेडसे लेणीला कसे जायचे? | How to reach Bedse caves?

विमानाने
पुणे येथील विमानतळ बेडसे लेणी पासून जवळचे आहे.
रेल्वे
पुणे रेल्वे स्टेशन बेडसे लेणी पासून जवळचे आहे. हे स्टेशन भारतातील प्रमुख शहरांना चांगले जोडलेले आहे.

बेडसे लेणीला जाण्यासाठी सर्वात्तम महिना | Best time to visit Bedse caves

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महीने बेडसे लेणीला भेट देण्यासाठी सर्वात्तम आहेत.

बेडसे लेणी उघडण्याची वेळ?

सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बेडसे लेणी खुली असते.

7. कान्हेरी लेणी | Kanheri caves information in Marathi language

ही लेणी मुंबई च्या बाहेर असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. कान्हेरी लेणीला कृष्णा या नावाने सुद्धा ओळखले जाते. या लेण्याच्या बांधकामामद्धे बेसाल्ट दगडाचा वापर केलेला आहे.
बोरिवली रेल्वे स्टेशन हे कान्हेरी लेणीपासून जवळचे आहे. कान्हेरी लेणी सोमवारी बंद असते. इतर दिवशी सकाळी ७.३० ते ६.३० वाजेपर्यंत ही लेणी खुली असते.

8. पांडव लेणी | Pandav caves information in Marathi language

पांडव लेणी ही त्रिवश्मी टेकडीवर वसलेली आहे. या लेणीमद्धे खडक कापून त्या खडकावर प्राण्यांचे आणि देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. ही लेणी पारंपारिक बौद्धशैलीमध्ये बांधलेली आहे. या लेणीमद्धे संग्रहालय सुद्धा आहेत.

पांडव लेणीला कसे जायचे? | How to reach Pandav caves?

विमानाने
नाशिक मधील गांधीनगर येथील विमानतळ हे पांडव लेणी पासून जवळचे आहे. पांडव लेणी ही गांधीनगर विमानतळापासून ३२.२ किमी अंतरावर आहे. हे विमानतळ जयपूर, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद यांसारख्या प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. या विमानतळापासून आपण टॅक्सी ने किंवा कॅब ने सुद्धा पांडव लेणी वर जाऊ शकतो.
रेल्वे
नाशिक रेल्वे स्टेशन हे पांडव लेणी पासून जवळचे रेल्वे स्टेशन आहे. ते १२.९ किमी अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी ने किंवा कॅब ने पांडव लेणीवर जाऊ शकतो.
बसने
पांडव लेणी नाशिकपासून जवळ असल्याने कारने जाताना नाशिकवरुन जाता येते किंवा नाशिकसाठी बस पकडता येते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे नाशिकच्या रस्त्याने जोडलेली आहेत. नाशिकपासून ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला पांडव लेण्यांपर्यंत नेऊ शकतात.
पांडव लेणी दररोज सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली असते.

9. महाकाली लेणी | Mahakali caves information in Marathi language

ही लेणी महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी आहे. महाकाली लेणीमद्धे १९ गुहा आहेत. या सर्व गुहा बौद्ध धर्माला समर्पित केलेल्या आहेत. या लेणीच्या भिंतीवर पाली भाषेमद्धे शिलालेख लिहलेले आहेत. ही लेणी मऊ बेसाल्टिक खडकामध्ये कोरलेली आहे. यामुळेच येथील काही शिल्पामध्ये आपल्याला झिज झालेली पहावयास मिळते.
महाकाली लेणी दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली असते.

अंधेरी रेल्वे स्टेशन आणि जोगेश्वरी रेल्वे स्टेशन हे महाकाली लेणीपासून जवळचे रेल्वेस्टेशन आहेत. या रेल्वे स्टेशनवरुन आपण टॅक्सी ने किंवा कॅब ने सुद्धा महाकाली लेणी वर जाऊ शकतो.
महाकाली लेण्यांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक वाहतूक बसेस मिळू शकतात. कोंडिवटे लेणी/महाकाली लेणी बस स्थानक, साईबाबा मंदिर मरोळ बस स्थानक, मॉडेल टाऊन (मजास) बस स्थानक, तक्षशिला बस स्थानक, होली स्पिरिट हॉस्पिटल बस स्थानक इत्यादी जवळपासच्या बसस्थानकांवरून महाकाली लेण्यांकडे जाणाऱ्या अनेक बसेस आहेत.

10. औरंगाबाद लेणी | Aurangabad caves information in Marathi language

औरंगाबाद लेणीमद्धे एकुण १२ गुहा आहेत. एकेकाळी ही लेणी बौद्ध धर्माच्या भिक्खूंचे तीर्थक्षेत्र होते. औरंगाबाद लेणी अप्रतिम रचनेसाठी प्रसिद्ध आहे. या लेणीच्या शिल्पांमध्ये विविध देव-देवी दर्शवलेले आहे.
औरंगाबाद लेणी दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुली असते.

या लेखामध्ये आपण महाराष्ट्रामधील प्रसिद्ध लेण्यांविषयी माहिती पाहिलेली आहे. या लेण्यांवर कसे जायचे, तसेच तिथे जाण्यासाठी सर्वात्तम महिना कोणता इत्यादी गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत.

Banner image by Ashok Prabhakaran

Scroll to Top